Breaking

Saturday, 20 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- बहुजन सत्यशोधक संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी कृष्णा पवार.


मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- बहुजन सत्यशोधक संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी कृष्णा पवार- याबाबत वृत्त असे की मोडनिंब- अरण येथील कृष्णा पवार यांची बहुजन सत्यशोधक संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, ही निवड बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनिलजी ओहोळ यांनी निवडीचे पत्र देऊन केली आहे, या निवडीनंतर कृष्णा पवार यांना सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत व पुढे बोलताना बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनिलजी ओहोळ हे म्हणाले की शाहू,फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आण्णा भाऊ साठे,माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी ही संघटना आहे व बहुजनांवरती होणारे अन्याय व अत्याचार, तसेच गोर- गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी, बहुजनांचा सर्वांगीण विकास हेच संघटनेचे कार्य असून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी कृष्णा पवार यांच्यावरती मी देत आहे असे सुनिलजी ओहोळ म्हणाले व नंतर पुढे बोलताना कृष्णा पवार यांनी आपण संघटनेच्या धैय्य व धोरणानुसार व महापुरूषांचे विचार घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कृष्णा पवार यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment