Breaking

Friday, 19 February 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बस स्थानकावर प्रवासी महिलेचे 45 हजाराचे दागिने चोरट्यांनी पळविले.


 बसस्थानकावर प्रवासी महिलेचे ४५ हजाराचे दागिने चोरटयांनी 
 मंगळवेढा बसस्थानकावर सोलापूरला जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवासी महिलेच्या गळयातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण बसमध्ये चढत असताना चोरटयाने  लंपास करण्याचा प्रकार नुकताच घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी महिला राजश्री जनार्धन पवार (वय ६५ रा.देगाव,सोलापूर) व मुलगा शंकर हे दि. १५ रोजी दुपारी २:३० वा. मंगळवेढा बसस्थावरून सोलापूरला जाण्यासाठी बसमध्ये बसमध्ये चढत असताना सदर महिलेच्या गळयातील ४५ हजार रुपये किमतीचे  दीड तोळयाचे गंठण अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे  
फिर्यादीत म्हटले आहे. 
दरम्यान,सोमवारदिवशी मंगळवेढयाचा आठवडा बाजार असल्यामुळे बसस्थाकावर नेहमीच गर्दी असते.
 यापुर्वी बर्‍याच वेळा प्रवाशांच्या चोर्‍या झाल्या आहेत. 
आगार प्रमुखांनी पोलिस प्रशासनास कायमस्वरूपी बस स्थानकावर पोलिस नेमणुक करण्यासाठी पत्रव्यवहारही केला आहे.
 मात्र पोलिस प्रशासनाने येथे पोलिस अंमलदाराची नेमला जात नसल्यामुळे वारंवार प्रवाशांच्या चोर्‍या होत आहेत.
बाजार असल्यामुळे बाहेरून चोरटे मंगळवेढयात दाखल होतात.
 यादिवशी  महिला प्रवाशांच्या गळयातील दागिने,मोबाईल अशा चोरीच्या घटना सातत्याने घडतात.
बाजारातून  सिव्हील ड्रेसवर गस्त घालण्याचीही पोलिस अधिकारी  तसदी घेत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
मागील सहा महिन्यापुर्वी पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरून मोटर सायकलच्या डिकीतून  लाखाच्या घरातील रोख रक्कम पळविण्याची घटना झाली. 
अदयापही तो चोरटा सापडला नाही. 
भर दिवसा दामाजी चौकातून एका महिलेला भूलथापा मारून भारत टॉकीज परिसरात नेवून रोख रक्कम काढून घेतली होती. 
याचाही तपास अदयापी नाही. 
बसस्थानकावर सी.सी.टि.व्ही. कॅमेरे आहेत.
 या कॅमेराच्या माध्यमातून पोलिस अधिकार्यांनी त्या चोरटयांचा कसून शोध लावावा अशी मागणी सातत्याने होत आहे.

No comments:

Post a Comment