Breaking

Friday, 19 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- एकाच रात्री अर्धा डझन चोर्या करून चोरट्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आवाहन.


 एकाच रात्री अर्धा डझन चोर्‍या करून चोरटयांनी पोलिस प्रशासनास दिले आव्हान......सोलापूर-
 सिध्दापूर येथे चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घालून जवळपास अर्धा डझन किराणा दुकान,मेडिकल फोडून रोख रक्कम,मोटर सायकल असा १ लाख १३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. 
दरम्यान,एकाच रात्री मोठया प्रमाणात चोर्‍या झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी अशोक लाड (रा.सिध्दापूर) यांचे साई किराणा स्टोअर्स असून दि. १७ च्या पहाटे ४:०० पुर्वी अज्ञात चोरटयाने बंद दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या ७३ हजार ३०० रुपयांच्या चलनी नोटा चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 
तसेच सचिन वाघमोडे यांचे अंबिका मेडिकल,प्रकाश कोळी यांचे रेणूका किराणा स्टोअर्स यांचेही बंद दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेली आहे.
याच गावातील महमदचांद शेख,दावल तांबोळी यांचेही दुकानाचे कुलूप तोडून रोख रक्कम  चोरून नेली आहे.
दरम्यान,या चोरीचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे करीत आहेत.
तिसर्‍या घटनेत यातील फिर्यादीत शिवगोंडा तळ्ळे यांच्या घरासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची ४० हजार रुपये किमतीची 
एम. एच. १३,डी.एफ ३५६६ ही मोटर सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.
या चोरीचा तपास पोलिस नाईक संतोष चव्हाण करीत आहेत.
दरम्यान,सध्या सुगी सराईचे दिवस चालू असल्यामुळे चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
एकाच दिवशी सिध्दापूरमध्ये अर्धा डझन चोर्‍या झाल्यामुळे व्यापारी व नागरिक भयभीत झाले आहेत.
 पोलिस अधिकार्यांना आत्तापर्यंत झालेल्या चोर्‍यामधील मुद्देमाल हस्तगत करणे व चोरांना पकडणे यात यश न आल्यामुळे चोरटयांचे मनोबल वाढल्याने चोर्‍यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवेढा शहरात ३५ लाख सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली होती. 
ही चोरी केवळ सोलापूर शहर  येथील गुन्हे अन्वेषणच्या (क्राईम ब्रांच)  पथकाने उघड करून आरोपीस जेरबंद केले. 
स्थानिक पोलिस अधिकार्यांना मात्र आत्तापर्यंत दाखल चोरीच्या गुन्हयातील आरोपीस पकडण्यास सध्या तरी यश प्राप्त झाले नाही.
कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनीच येथील स्थानिक पोलिस अधिकार्यांना  आपल्या कर्तव्यात लक्ष घालून त्यांना  विशेष मार्गदर्शन करून भविष्यात होणार्‍या चोर्‍या रोखाव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment