Breaking

Friday, 19 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब जि.प.शाळा नं.1 मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.



*मोडनिंब जि.प.शाळा नं. १ मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.*

*आज १९ फेब्रुवारी हा दिवस  छत्रपती शिवरायांचा जन्मदिन शिवजयंती सोहळा  साजरा करण्यात आला.*
*शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मोहन कुंभार सर, उपाध्यक्षा सौ. रुपालीताई खडके, मुख्याध्यापक श्री गोरे गुरुजी यांनी शिवप्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.*
*श्री बनसोडे गुरुजी, श्रीम. सारिका नाळे , श्री गोरे गुरुजी, यांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या अंगी असलेल्या  विविध गुणांचा गौरव केला, जयघोष केला.* 
*अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री मोहन कुंभार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सर्व विद्यार्थ्यांना सांगाव्यात असे आवाहन केले.*
*या शिवजन्मोत्सवाच्या कार्यकमाचे सूत्रसंचलन श्री ढोबळे गुरुजी यांनी केले. तर आभार श्री मनाळे गुरुजी यांनी मानले.*
*या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री मोहन कुंभार सर, उपाध्यक्षा सौ. रुपालीताई खडके, मुख्याध्यापक श्री  राजकुमार गोरे, श्रीम. संगीता सावंत, श्रीम. विद्या भानवसे, श्रीम. सारिका नाळे, श्रीम. मेधा कोुंडभैरी, श्रीम. जयश्री शिंदे, श्रीम. वृषाली भोसले, श्री अशोक ढोबळे, श्री सोमनाथ बनसोडे, श्री पांडुरंग घुगे, श्री अतुल थोरात, श्री दादा गायकवाड व श्री अनिल मनाळे हे उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment