Breaking

Monday, 25 January 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- आम्ही देखील याच देशाचे आहोत, आमचीही जनगणना करा...पंकजाताई मुंडे.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- आम्ही देखील याच देशाचे आहोत, 
आमचीही जनगणना करा....
पंकजाताई मुंडे.
 
ओ.बी.सीं.च्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी रविवार जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता.
 या पार्श्वभूमीवर भा.ज.पा. नेत्या पंकजाताई मुंडे यांनी भा.ज.पा.चे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओ.बी.सी. समजाच्या हक्कांसाठी लोकभेत केलेल्या भाषणाचा एक व्हि.डि.ओ. ट्विटरवर शेअर करून, ओ.बी.सीं.ची जनगणना आवश्यक असल्याची मागणी केल्याचे दिसून आले.
 “आम्ही देखील याच देशाचे आहोत, आमचीही जनगणना करा…, 
ओ.बी.सीं.ची जनगणनेची आवश्यकता आणि अनिवार्यता आहे.
 काही आठवणी आणि काही वचने..” असं पंकजाताई  मुंडेंनी ट्विट केलं आहे. 
ओ.बी.सी. समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल,
  तसेच, “२०२१ ची जनगणना जातिनिहाय होणं आवश्यक आहे.
 गावागावांमधून निघालेला आवाज राजधानीपर्यंत नक्कीच पोहचणार, याबद्दल काहीच शंका नाही.” 
असं देखील पंकजाताई मुंडेंनी म्हटलं आहे.
 दरम्यान, “एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओ.बी.सी. समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत.
 बहुजन कल्याण विभाग मंत्री म्हणून ओ.बी.सीं.च्या स्वतंत्र जनगणनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे.
 आवश्यकता पडल्यास स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी विधानसभेत मांडेल. 
जेथे संधी मिळेल तेथे ओ.बी.सी. समाजाचा आवाज उचलून धरणार.
 पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओ.बी.सी. म्हणून उभा आहे.” असं विधान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  जालन्यात केलं .

No comments:

Post a Comment