मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके-
आर.बी.आय.(R.B.I.) खरंच बाद करणार का 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा?
सरकारने दिलं स्पष्टीकरण......
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आर.बी.आय. मार्च किंवा एप्रिलपर्यंत १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.
गेल्या आठवड्यात अनेक माध्यमांमध्येही तशाप्रकारचं वृत्त झळकलं.
अखेर याची दखल घेत सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पी.आय.बी.) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पी.आय.बी.ने ‘पी.आय.बी. फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं असून या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं जातं.
काय आहे सत्य ?
“आर.बी.आय.कडून मार्च २०२१ पासून १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत, असा दावा एका वृत्तामध्ये केला जातोय, मात्र या वृत्तात कोणतंही तथ्य नाहीये” असं पी.आय.बी.कडून सांगण्यात आलंय.
याशिवाय, “आर.बी.आय.कडून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही” असंही पी.आय.बी.ने स्पष्ट केलंय.
ट्विटरद्वारे ‘पी.आय.बी. फॅक्ट चेक’ने ही माहिती दिली.
पी.आय.बी. फॅक्ट चेक :-
पी.आय.बी. फॅक्ट चेक केंद्र
सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग /
सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पी.आय.बी. फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते.


No comments:
Post a Comment