Breaking

Sunday, 8 November 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- दत्तनगर ( मोडनिंब) मधील अंतर्गत रस्ते लवकरात लवकर करा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा धनाजी लादे यांचा इशारा.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- दत्तनगर ( मोडनिंब) मधील अंतर्गत रस्ते लवकरात लवकर करा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा धनाजी लादे यांचा  इशारा- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब वाॅर्ड क्रमांक 5 दत्तनगर या भागात जवळ जवळ 22 अंतर्गत रस्ते आहेत आणी यातील फक्त 2 रस्त्यांचे काम पूर्ण झालेले आहे. 






परंतु अध्यापही उर्वरित रस्त्यांचे कामे होणे बाकी आहे, व विशेष म्हणजे या भागाचे ग्रामपंचायत सदस्य हे सध्या मोडनिंब चे सरपंच आहेत आणी असे असताना सुद्धा दत्तनगर मधील रस्त्यांची कामे पूर्ण होत नाहीत व ग्रामपंचायतीच्या खात्यावर 25/15 चा निधी शिल्लक आहे तरी सुद्धा कामे मंजूर केली जात नाहीत याऊलट आतापर्यंत फक्त आश्वासन दिले गेले आहे.






तसेच दत्तनगर या भागात मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे, व मोडनिंब मधला सुशिक्षित लोकांचा भाग म्हणून दत्तनगर या भागाकडे बघितले जाते अनेक लोक या भागात प्लाॅट घेऊन बांधकाम करत असतात, परंतु सध्या दत्तनगर भागात अंतर्गत असणार्या रस्त्यांची अवस्था ही फार बिकट आहे व रस्त्याच्या मधोमध मोठ मोठे खड्डे पडलेले असल्याने व अनेक छोटे मोठे अपघात येथे होत असतात व नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.






म्हणून मोडनिंब भाजपा चे शहराध्यक्ष धनाजी लादे हे यासंदर्भात वारंवार आवाज उठवत आहेत, तसेच त्यांनी 25/15 च्या निधीतून दत्तनगर मधील अंतर्गत रस्ते लवकरात लवकर व्हावेत अशी मागणी ग्रामसेवक काटकर साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे व रस्ते मंजूर न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा धनाजी लादे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment