Breaking

Wednesday, 6 January 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- भारतीय जनता पार्टी चा आंदोलनाचा इशारा.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- भारतीय जनता पार्टी चा आंदोलनाचा इशारा- याबाबत सविस्तर वृत्त असे की टेंभुर्णी एमआयडीसीमधील खंडोबा डिसलरी या कंपनीमधील मळी व केमिकल मिश्रित सांडपाणी कंपनी उघड्यावरती सोडत असून.त्यातीलच काही पाणी कंपनी सदर कंपनीच्या पाठीमागे असलेल्या तळ्यामध्ये सोडत आहे. हे उघड्यावरती व तळ्यांमध्ये सोडण्यात येणारे केमिकल व मळी मिश्रित सांडपाणी कंपनीने ताबडतोब बंद करावे,अन्यथा कंपनीच्या गेट समोर आंदोलन करण्यात येईल.
वरील संदर्भाचे निवेदन मा उपप्रादेशिक अधिकारी सो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर  यांना ही काल देण्यात आले आहे. मा उपप्रादेशिक अधिकारी सो यांनीही कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
कंपनीने स्वतःहून हे मळी व केमिकल मिश्रित पाणी सोडणे बंद करावे व या आगोदर सोडलेल्या उघड्यावरील पाण्याची विल्हेवाट लावावी,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा टेंभुणी शहराच्या वतीने कंपनीच्या गेट समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची सदर कंपनीने दखल घ्यावी.

No comments:

Post a Comment