सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - अरण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मोडनिंब चे माजी सरपंच मा बाबूतात्या सुर्वे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील अरण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे त्याकडे ठेकेदाराचे व शासनाचे दुर्लक्ष होत आहे व मोडनिंब व परिसरात असणारी अरण,जाधववाडी, बैरागवाडी, आष्टी, गिड्डेवाडी या गावातील नागरिकांची ये-जा करण्यासाठी गैरसोय होत असून रस्त्यावर असणार्या खड्ड्यांमुळे जिवघेणे झाले असून त्यामुळे अनेक नागरिकांचा जिव धोक्यात आला आहे, तसेच पांडुरंग व सावता माळी यांच्या भेटीचा हाच पालखी मार्ग असून प्रत्येक वर्षी लाखो लोक याच मार्गाने अरण ला व पंढरपूर ला जात असतात तरीही शासनाचे व ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष आहे म्हणून काम चालू होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी व मोडनिंब चे माजी सरपंच मा बाबूतात्या सुर्वे यांनी दिला आहे.
Tuesday, 26 January 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - अरण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मोडनिंब चे माजी सरपंच मा बाबूतात्या सुर्वे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - अरण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मोडनिंब चे माजी सरपंच मा बाबूतात्या सुर्वे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment