Breaking

Tuesday, 26 January 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - अरण येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी केले रक्तदान.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - अरण येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी केले रक्तदान- याबाबत सविस्तर वृत्त असे की 
 ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून   अविष्यत ट्रस्ट,व अरण ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामधे  १०१ रक्तदात्यानी रक्तदान करुन आरोग्य विषयीच्या देशकार्यास  हातभार लावला.आपली सामाजिक बांधिलकी संभाळली. पहिल्यांदा रक्तदान केलेल्या नवीन रक्तदात्यांचे मनापासून अभिनंदन.  या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात [डॉ मिलिंद बागुल- गजानन  बनसोडे- भागवत पाटील- महेश Ghadge अक्षय vasekar-  सागर घाडगे-  व त्यांचा मित्र परिवार]यांनी मोठ्ठी जबाबदारी पेलली , खरच या मित्रांनी एकत्र येऊन मोठा सामाजिक  उपक्रम यशस्वी केला. या शिबिरात ६० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ. सतिश माने ,डॉ अशिष शेंडगे,डॉ धनंजय कुलकर्णी,सुप्रिया शेळके,डॉ अजिंक्य गिड्डे, डॉ.किसन गायकवाड यांनी गावातील जेष्ठ नागरिकांचीही    आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले .

No comments:

Post a Comment