Breaking

Saturday, 2 January 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- शहापूरच्या जवानाचे कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन.


सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते-शहापूरच्या जवानाचे कर्तव्य बजावताना आकस्मिक निधन-कोपर्डे हवेली शहापूर, ता. कराड येथील जवान नाईक कृष्णात दिलीप कांबळे (३४ वर्षे)यांचे कर्तव्य बजावत असताना आकस्मित निधन झाले. ते भारतीय सेनेत आर्मी सर्व्हिस कोअर ग्वाल्हेर (मध्यप्रदेश)येथे सेवा बजावत होते.
निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदयपिळवटून टाकणारा होता. जवान कृष्णात कांबळे यांनी आपला सेवकाळ पूर्ण केला.
मात्र त्यांना सैन्य दलाकडून दोन वर्षांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी व आठ वर्षीय कन्या असा परिवार आहे.


No comments:

Post a Comment