बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- *MPSC व पोलीस भरती तात्काळ करावी - अभविपचे तहसीलदारांना निवेदन*
घनसावंगी - महाराष्ट्र शासनाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षे संदर्भात व पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात असणाऱ्या समस्या त्वरित सोडवाव्यात. मागील काही महिन्यापासून MPSC व पोलीस भरती या विषयाला महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नाही परीक्षेच्या तारखे विषयात फक्त ढकला-ढकल होत आहे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करून MPSC च्या परीक्षेची व पोलीस भरतीची वाट पाहत आहेत.सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हॉटेल,लॉज,मार्केट अशे सुरू झाले आहेत त्यामुळे फक्त MPSC व पोलीस भरती मुळेच कोरोना वाढतो का...? असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची परीक्षा त्वरित घ्यावी व पोलीस भरतीची तारीख जाहीर करून लवकर भरती करावी अशी मागणी अभविप करत आहे...
*मागण्या...*
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ,पोलीस भरती व इतर सरळ सेवा यांच्या तारखा जाहीर करणे.
2) महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत 2021 ची भरती काढणे.
3) MPSC च्या 2020 आणि 2021 च्या भरती मध्ये उप जिल्हाअधिकारी व पोलीस उप अधीक्षक यांच्या जागा वाढवण्यात याव्या.
*विद्यार्थ्यांच्या वरील मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात अन्यथा येणाऱ्या काळात अभाविप तीव्र आंदोलन करेल.*


No comments:
Post a Comment