Breaking

Tuesday, 26 January 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंतीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा-
प्रशासक एन.एस. काळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
-भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन सोहळा हुलजंतीत सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे व शासकीय आदेशाचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम व उपक्रम रद्द करण्यात आले. हुलजंती ग्रामपंचायतीमध्ये देखील ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन सोहळा मंगळवार दि.26 रोजी पार पडला. प्रशासक पंचायत समिती विस्तार अधिकारी एन.एस.काळे   यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. 
त्याच्याबरोबर गावातील शाळा, प्रशाला व तलाठी कार्यालय येथेही शासकीय पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
 यावेळी हुलजंती ग्रामपंचयत नवनिर्वाचित सदस्या, ग्रामपंचयत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष जामदार, तलाठी विजय एकतपुरे, कोतवाल गुलाब सोनवले, मेजर सागर भोरकडे, पोलीस पाटील जिवाजी सोनवले,पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव, पोलिस नाईक हरिदास सलगर, होमगार्ड विष्णू कांबळे, माजी सरपंच गोविंद भोरकडे, माजी उपसभापती शिवाजी पटाप, प्रशालेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,  ग्राहक मंच जिल्हा अध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), ग्रामसुरक्षा दल अध्यक्ष अमीर आतार, पत्रकार रोहिदास भोरकडे, म्हाळाप्पा शिंदे, भीमराव निगडी, अरविंद जंगमशेट्टी, दिपक खानविलकर, श्रीशैल चौधरी, शामराव कुरमुते. अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेवक सेविका, आशा वर्कर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment