माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा तालुक्यातील पालवण येथे ग्रामपंचायत निवडणूकीत तब्बल 20 वर्षानंतर सत्तांतर- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब.
माढा तालुक्यातील पालवण येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल वीस वर्षानंतर सत्तांतर झाले असून अतुल क्षीरसागर व परमेश्वर पाटील यांच्या सांजोबा ग्राम विकास आघाडीने सातपैकी पाच जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे.
विजयी उमेदवार प्रभाग 1 मधून किरण क्षीरसागर, सतीश मदने, तारामती रणदिवे, प्रभाग 2 मधून राजश्री क्षीरसागर व मंगल मदने या विजयी झाले असून विरोधी पॅनलचे धनराज साळुंखे यांच्या ग्रामविकास आघाडीचे रूपाली साळुंखे व मधुकर ओहोळ हे दोन उमेदवार विजयी झाले. वरील दोन्ही गट आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक आहेत.


No comments:
Post a Comment