Breaking

Wednesday, 20 January 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पोलिसांची मदत घेण्यासाठी 112 हा क्रमांक.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/अमीर आतार- पोलिसांची मदत घेण्यासाठी ११२ क्रमांक -

नागरिकांना काही मिनिटातच आता पोलिसांची मदत मिळणार आहे. ११२ हा नंबर येत्या २६ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होत आहे. ११२ नंबरवर पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क करावा लागेल. एमईआरएस (महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पाॅन्स सर्व्हिसेस) अंतर्गत राज्यातील प्रत्येक शहरातील नियंत्रण कक्षात (पोलिस आयुक्त व अधीक्षक कार्यालय) डायल ११२ नंबर अमलात येईल. आपण फोन केल्यास आपल्या फोनचे लोकेशन दिसणार आहे. त्यानंतर पोलिस आपले म्हणणे ऐकून घेतील. संबंधित ठिकाण कुठले आहे, पोलिस पेट्रोलिंग पथक जवळ आहे त्या लोकेशननुसार त्यांना मेसेज जाईल. ते पथक आपल्या मदतीस येईल. महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर काही अप्रिय प्रसंग आला असेल.

त्यांना काही मदत पाहिजे असेल किंवा काही घरगुती भांडणे असतील. रस्त्यावर गोंधळ सुरू असेल तर आपण सध्या १०० नंबरवर फोन करतो. आता ११२ डायल नंबर कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे यांनी दिली.

१०० नंबरवरून पोलिसांना अनेकदा विनाकारण फोन यायचे. याची माहिती घेण्यात वेळ जात होता. आता ११२ या नंबरवरून फोन केल्यास आलेला फोन कळणार आहे. ज्या व्यक्तींना खरच मदत पाहिजे त्यांना मदत मिळेल. २६ जानेवारी रोजी काही शहरात सुरुवात होणार आहे. एक मेपर्यंत सक्षमपणे याचे काम चालणार आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्यात ही सेवा सुरू आहे.

No comments:

Post a Comment