मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके-उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) कार्यालयात विनयभंग,
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आर.टी.ओ.) महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कथित माहिती अधिकार कार्यकर्ता शरद धुमाळ याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.
धुमाळ याने गेल्या पाच वर्षांत ‘आर.टी.ओ.’ कार्यालयात सुमारे १५०० माहिती अधिकाराचे अर्ज केले होते.
पीडित महिला ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लिपीक पदावर कार्यरत आहे.
तर भिवंडी येथील रहिवासी असलेला शरद धुमाळ हा माहितीच्या अधिकारात माहिती मिळविण्यासाठी कार्यालयात येत असतो.
कार्यालयातील इतर महिलांकडे पाहूनही तो अश्लील शेरेबाजी करत असे.
याबाबत काही महिलांनी विशाखा समितीकडे तक्रार दिली होती.
मात्र, समितीच्या सुनावणीलाही तो गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे.


No comments:
Post a Comment