मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- क्राईम ब्रांच सोलापूर शहर यांचेकडून IPL क्रिकेट चा सट्टा चालवणारी कंपनी उघडकीस आणून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश- याबाबत सविस्तर वृत्त असे की मा.श्री. अंकुश शिंदे पोलिस आयुक्त, सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी यांना सोलापूर शहरातील IPL क्रिकेट सट्टा चालकांची माहीती काढून त्यावर कारवाई करणेबाबतचे आदेश दिले.
मा.श्री. अंकुश शिंदे पोलिस आयुक्त, सोलापूर शहर यांनी प्राप्त गोपनीय माहीती वरून व दिलेल्या आदेशाप्रमाणे पोसई/संदीप रंगराव शिंदे यांनी त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदारांच्या मदतीने, दि.6/11/2020 रोजी 16.10 वा. चे सुमारास अवंतीनगर भाग-2 मधील पर्ल हाईटस् च्या प्लॅट नं.2 या ठिकाणी छाप्याची कारवाई करून आरोपी नामे 01) चेतन रामचंद्र वन्नाल, वय-26 वर्षे , रा.गांधी नगर झोपडपट्टी नं-3, वेंकटेश मेडिकल शेजारी , अक्कलकोट रोड, सोलापूर, 02) दिग्नेश नागनाथ गाजूल , वय-24 वर्षे, रा-1307, भद्रावती पेठ, सोलापूर हे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर IPL सामना चालू असताना टी.व्ही. वरील चालू क्रिकेट मॅच पाहत, टाॅस कोण जिंकेल 6,10,15 व 20 ओव्हर्स ( सेशन) मध्ये किती धावा होतील व शेवटी सामना कोणती टीम जिंकेल, यावर मोबाईलद्वारे रोज सट्टा लावणारे इसमांकडून फोनवरून सट्टा घेऊन, त्याचा हिशोब पाहता ( लिहित) असताना मिळून आले, सदर इसमांना सट्टेबाजांकडून जमा होणारी रक्कम व त्यांना मिळालेली रक्कम यामध्ये लाखो रुपयांचा लाभ सट्टा चालविणारे मालक व भागीदारांना होत असून, यामधील सर्व भागीदार हे बक्षिसाच्या रकमेचे आमिष दाखवून सर्व सामान्य लोकांची फसवणूक करित असताना मिळून आले, तसेच त्यांनी कोरोना या संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या अनुषंगाने इतराच्या जिवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणून साथीच्या रोगाचा संसर्ग पसरवण्याची हयगयीची कृती केली, नमूद आरोपीसह त्यांचे साथीदारांविरोद्ध फौजदार चावडी पोलिस ठाणेस महाराष्ट्र जुगार कायदा कलम-4, 5 सह भा.दं.वि.कलम 420,109,269,336 सह, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2005 चे कलम 66 डी सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 चे कलम-51(ब), सह साथरोग अधिनियम-1897 चे कलम-3 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास संजय तु.साळुंखे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर शहर हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी चेतन रामचंद्र वन्नाल, वय-26 वर्षे, रा.गांधीनगर झोपडपट्टी नं-3 , वेंकटेश मेडिकल शेजारी, अक्कलकोट रोड, सोलापूर याने दिलेल्या माहितीवरून संजय तु.साळुंखे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी पोसई/ संदीप शिंदे व गुन्हे शाखेकडील पुरूष व महिला अंमलदारासह गुलबर्गा येथे जाऊन बसवेश्वर नगर गुलबर्गा येथील घरातून आरोपी नामे अतुल सुरेश शिरशेट्टी रा.अवंतीनगर, सोलापूर व प्रदीप मल्लय्या कारंजे रा.75/22,भवानी पेठ, सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून 3 लॅपटॉप, 1 टॅब, 13 मोबाईल हॅन्डसेट, 1 माईक, 3 लॅपटॉप चार्जर, 1 हाॅटलाईन मशीन 13 मोबाईल जोडलेले असलेला,मोडेम, सेट टाॅप बाॅक्स, सॅमसंग कंपनीचा टी.व्ही, डि.व्ही. आर इ 3,33,200/- रूपये किंमतीचे आयपीएल सट्टा खेळणेकरिता वापरात येणारे साहित्य व अंदाजे 30,00,00/- किंमतीचे वाहने त्यात एक टाटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा कार तिचा क्रमांक के,ए,51 एम.पी, 9955 व मारूती सुझुकी ब्रिझा तिचा क्रमांक एम एच 13 डी ई 7172 जप्त करण्यात आलेली आहेत. आतापर्यंत सदर गुन्ह्यात वापरलेली वाहने, सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य व 3,40,000/- रू रोख असा मिळून एकूण 38,44,200/- रूपयांचे ( अडोतीस लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रू) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात अटक आरोपींकडे केलेल्या तपासा दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकातील शहरात असलेल्या एजंटकरवी IPL क्रिकेट सट्टा स्विकारलेला आहे व एजंटमार्फत सर्व सामान्य माणसाला जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून स्वताच्या आर्थिक फायदयासाठी सर्व सामान्य लोकांची फसवणूक केल्याची माहिती उजेडात आलेली आहे. तपासिक अधिकारी यांचेकडून यातील आरोपी क्रमांक 04 व 05 यांनी वापरलेले लॅपटॉप , मोबाईल मध्ये असलेल्या डाटाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे कौशल्याने तपास करून गुन्ह्यातील पुरावा हस्तगत करण्यासाठी कसोशिने प्रयत्न चालू आहे.
सदरची कामगिरी मा.पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मा.पोलिस उपआयुक्त गुन्हे बापू बांगर, मा.सहा पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि गुन्हे शाखा संजय तु. साळुंखे, पोउपनि संदीप शिंदे, पोहेकाॅ औदुंबर आटोळे, दिलील नागटिळक, पोना जयशिंग भोई, पोकाॅ संजय साळुंखे, सिद्धाराम देशमुख, गणेश शिंदे, सागर गुंड, विद्यासागर मोहिते, सोमनाथ सुरवसे, अश्रुभान दुधाळ, कुमार शेळके, सनी राठोड, सुरज देशमुख, मपोका आरती यादव, चालक पोना राहूल गायकवाड, नेताजी गुंड या पथकाने केली आहे.


No comments:
Post a Comment