मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज-*बिनविरोध निवडणुक चा खंडाळी गावचा निर्धार पक्का*
*खंडाळी ग्रामपंचायत ची दुसरी ग्रामसभा यशस्वी*
*शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती*
*सर्व जाती धर्मातील लोक आले एकत्र*
*पोलिस निरीक्षक सायकर साहेबांची उपस्थिती*
खंडाळी :- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहिर होताच प्रत्येक गावा गावात मोर्चे गट व तट बांधणी सूरू होत असतानाच मोहोळ तालुक्यातील खंडाळी या गावात मात्र बिनविरोध निवडणूक करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले आहे. काही दिवसांपूर्वी या गावाची ओळख संवेदनशील गाव म्हणून झाली होती. पण गावातील काही तरूणांनी पुढाकार घेऊन याच गावाची ओळख हि आदर्श गाव करण्यासाठी कंबर कसली आहे. गावातील मारूती मंदिरात झालेल्या दुसरया ग्रामसभेत शेकडो ग्रामस्थांनी स्व इच्छेने उपस्थिती नोंदविली. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मोहोळ तालुका पोलीस स्टेशनचे चे पोलिस निरीक्षक सायकर साहेब उपस्थित होते. यावेळी त्यांनी निवडणूक लागण्याचे आणि न लागण्याचे फायदे व तोटे यावर गावकरयांसोबत संवाद साधला. यावेळी सरपंच राजेंद्र मुळे, शरद काळे,पंपू मुळे, पंपू श्रीखंडे, शामराव सिरसट,बाळासाहेब मुळे,दादासाहेब पाटील,सचिन बाबर, लश्मण मुळे, हरि लोंढे,शशी कसबे, उत्तम मुळे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. गावातील विकास पाटील यांनी आदर्श गाव,आदर्श राजकारण व आदर्श सरपंच या विषयावर मांडलेली भूमिका गावाला एक दिशा देत आहे. या संकल्पनेला गावकरयांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य व पाठबळ दिले आहे. यावेळी ग्रामसभेत बिनविरोध निवडणुक करण्यासाठी काही ठराव केले. यामध्ये 13 उमेदवार हे कोणत्या एका पार्टीचे न निवडता ते वार्ड रचनेच्या नियमानुसार संपूर्ण गावाच्या आवडीचे असावेत,सरपंच पदासाठी कोणत्याही जातीचे आरक्षण येऊ त्या जातीतील सर्वोच्च सुशिक्षित, चरित्रवाण व गावचा रहिवाशी
असलेला उमेदवार हे गाव ठरविणार, कोणतीही पार्टी असा उमेदवार ठरविनार नाही. ज्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच अथवा अगदी सदस्यत्व जरी मिळविले असले तरी त्यांनी परत निवडणुकीस ऊभा राहू नये,
सरपंच पदाचे आरक्षण जाहिर होताच ग्रामसभा बोलाऊन त्या पदासाठी निरव्यसनी,सुशिक्षित,
व निस्वार्थी तरुण व्यक्तीची निवड करण्यात येईल,सर्व पार्टी प्रमुखांनी निवडणुक लागू नये याची जबाबदारी घ्यायची आणि जी पार्टी निवडणुक लावेल त्या पार्टीवर गावाने बहिष्कार घालावा,निवडणूक बिनविरोध करून आलेला सर्व बक्षीसपर निधी गावातील शैक्षणिक व्यवस्थेसाठी द्यावा,शासन, प्रशासन व ग्रामस्थ यांचा मेळ घालणारा उमेदवार असावा,कोणतेही व्यसन असलेला उमेदवार नसावा,
गावाच्या सर्व कारभाराचे नियोजन करण्याची क्षमता त्या उमेद्वारामध्ये असावी,जाती धर्माचे राजकारण नको,सर्वसमावेशक विचार असलेला उमेदवार असावा,पार्टी प्रमुख हाच निवडणुक,
लागल्यास जबाबदार असेल व अशा पार्टीस गावाने कितपत सहकार्य करायचे हे ग्रामसभेत
ठरवायचे व अशा व्यक्ती बद्दल गावानेच निर्णय घ्यायचा.


No comments:
Post a Comment