मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे वाचनालय मोडनिंब येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी- याबाबत सविस्तर वृत्त असे की *लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाचनालय मोडनिंब येथे लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली*
*भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक शिक्षणाचे महत्व ओळखून आपल्या मुलीला शाळेत पाठवणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 226 वी जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे साजरी करण्यात आली*
*यावेळी डॉ. योगेश (दादा) गिड्डे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले*
*यावेळी लहुजी यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल महात्मा फुले यांनी बहुजनाच्या उन्नतीसाठी केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल तसेच शिक्षणाच्या क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांना शेवटच्या क्षणापर्यंत शैक्षणिक चळवळीस केलेल्या कार्याबद्दल प्राध्यापक अजित कसबे सर यांनी आपले विचार व्यक्त केले*
*यावेळी प्रमुख उपस्थिती संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद नागटिळक, वैभव कसबे सर, विठ्ठल जाडकर, गोपीनाथ खंदारे, अतुल पाटोळे, गणेश पाटोळे, भारत घाडगे इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते*
*कार्यक्रमाचे आभार मातंग एकता आंदोलनाचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष आनंद जाधव यांनी मानले*


No comments:
Post a Comment