Breaking

Tuesday, 10 November 2020

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- पिकअप मधून उडी मारल्याने महिलेचा जागीच मृत्यू.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- पिकअप मधून उडी मारल्याने महिलेचा जागीच मृत्यू- याबाबत सविस्तर वृत्त असे की 
नेकणूर- लिंबागणेश येथून मांजरसुब्याकडे दूध घेउन निघालेल्या पिकअप मध्ये न सांगता एक भोळसर महिला गाडीत बसली होती. 





सदर गाडी मांजरसुबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा फाट्यापर्यंत आल्यानंतर चालू पिकअप मधून त्या महिलेने मागच्या मागे उडी मारल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, आणी त्यातच ती गतप्राण झाली. 






रुक्मिणी जगदीश ढास ( वय-40) या असे भोळसर महिलेचे नाव आहे. घटनास्थळी नेकणूर पोलिस ठाणे उपनिरीक्षक विलास जाधव आणी लिंबागणेश पोलिस चौकीचे जमादार श्री.सोनवणे यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून रुक्मिणी ढास यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment