बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- कार्तिकी यात्रा रद्द केल्यास निवडणुकांवर बहिष्कार, पंढरपूर येथे वारकरी संप्रदायाचा सरकारला इशारा- याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आषाडी यात्रेप्रमाणे संचारबंदी सारखे कडक निर्बंध घालून कार्तिकी यात्रा रद्द केल्यास आगामी काळात होणार्या प्रत्येक निवडणुकीच्या मतदानावर वारकरी संप्रदाय बहिष्कार टाकेल, असा गंभीर इशारा वारकरी संप्रदायाचा राज्य सरकारला देण्यात आला.
केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेले नियम तसेच वारकरी संप्रदायाने यात्रा नियोजनासंदर्भात राज्य शासनाला दिलेला प्रस्ताव या दोन्ही च्या समन्वयातून कार्तिकी यात्रेचे नियोजन केले जावे, अशी वारकरी संप्रदायाची मागणी आहे.
कार्तिकी यात्रे संदर्भात सर्व समावेशक अशी एकच भूमिका मांडण्यासाठी संत वंशज, प्रमुख वारकरी संघटना, महाराज मंडळी, यांचा एकत्रित समावेश असणारी कार्तिकी यात्रा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी येथील वासकर महाराजांच्या वाड्यात रविवारी खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी देवव्रत उर्फ राणा महाराज वासकर यांनी हा इशारा दिला आहे.


No comments:
Post a Comment