Breaking

Sunday, 27 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत आमदार बबनदादा शिंदे यांचे प्रशासनाला आदेश.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत आमदार बबनदादा शिंदे यांचे प्रशासनाला आदेश- याबाबत सविस्तर वृत्त असे की अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आ.बबनदादा शिंदे संबंधित तहसीलदार, कृषी विभाग व कर्मचार्यांना दिल्या आहेत, दोन दिवसांपूर्वी शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे भरपाई देण्याचे आदेश आ.बबनदादा शिंदे यांनी दिले आहेत, पिराची कुरोली, वाडी कुरोली, खळवे येथील पाहणी वेळी जि.प.सदस्य, रणजितसिंह शिंदे यांनी पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला काही ठिकाणी नुकत्याच झालेल्या ऊसाच्या लागणी जमिनी वाहून गेल्या आहेत, असा नुकसान कारक पाऊस गेल्या वीस वर्षांत कधीच पडला नाही अशी भावना यावेळी शेतकर्यांनकडून केली गेली आहे, लागोपाठ दोन दिवस ढग फुटी सदृश्य पाऊस झालेने पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यातील अनेक गावात विविध प्रकारचे पिकांचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे,नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आ.बबनदादा शिंदे यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment