हुलजंती येथील सामाजिक कार्यकर्ते व VBP न्यूज चे मंगळवेढा तालुका प्रतिनिधी मा. आमिर आतार यांची मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी निवड
मंगळवेढा प्रतिनिधी . हुलजंती येथील सामाजिक कार्यकर्ते . तसेच अत्तार संघटना सोशल मीडिया प्रमुख व VBP न्यूज चे मंगळवेढा तालुका प्रतिनिधी मा.अमीर मेहबूब आतार मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र (मास), *मंगळवेढा तालुका अध्यक्ष पदी निवड* करण्यात आली आहे, या नियुक्ति चे पत्र प्रदेश अध्यक्ष रशीद शेख व राष्ट्रिय प्रवक्ते हाजी सय्यद ईरशाद अशरफी यानी दिले.त्याबद्दल मी प्रदेश अध्यक्ष रशीद शेख व राष्ट्रिय प्रवक्ते हाजी सय्यद ईरशाद अशरफी यांचे आभार व्यक्त करतो.
आज पर्यंत मी शहर व तालुका स्तरावर काम करत होतो, आता पासून माझी जबाबदारी वाढली व काम करण्यास मला संधी दिली. मी समाजातील तरुणांना एकत्रित करून, त्यांना जागरूक करून, भारतीय घटने प्रमाणे शासनाकडून आपल्या हक्काच्या लढाई साठी त्यांना मदत करेन.माझे सर्व मित्र परिवार, सर्व राजकीय/ सामाजिक बांधवानी शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.


No comments:
Post a Comment