Breaking

Saturday, 26 September 2020

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पात्रात वाढ, महातपुरी गावात पाणी शिरले.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पात्रात वाढ, महातपुरी गावात पाणी शिरले- याबाबत सविस्तर वृत्त असे की आज झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदवरी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ होऊन माजलगाव तालुक्यातील महातपुरी या गावात पाणी शिरले आहे व त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, अनेक नागरिकांच्या घराघरात पाणी शिरले असून अनेकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे व तसेच शेतकर्यांनाही याची झळ बसली आहे त्यामुळे तेथील नागरिकांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे व तसेच गावात पूरस्थिती निर्माण झालेने वीजपुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे गावातील पूरस्थिती व वीजपुरवठा बाबतीत तरूणांनी पाहणी करून प्रशासनाला पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विनंती केली आहे व स्वत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच प्रदीप काळे, अंकुश जगदाळे, संतोष कोलते, सुदामराजे शिंगाडे, ABVP शहर मंत्री उद्धव चह्वाण यांच्या अंगणात पाणी शिरले आहे व त्यामुळे प्रशासनाने यात वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी तरूण वर्गातून व नागरिकांतून होत आहे.

No comments:

Post a Comment