Breaking

Monday, 28 September 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- कामठी नागपूर येथे झालेल्या नाभिक समाजातील व्यक्तीच्या हत्येचा योग्य तपास ह्वावा यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने कुर्डूवाडी प्रांत कार्यालयाला निवेदन.


माढा तालुका प्रतिनिधी / मदन मुंगळे- कामठी नागपूर येथे झालेल्या नाभिक समाजातील व्यक्तीच्या हत्येचा योग्य तपास ह्वावा यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने कुर्डूवाडी प्रांत कार्यालयाला निवेदन- नागपुर जिल्ह्यातील कामठी या शहरात हा निंदनिय प्रकार घडला अाहे.अशी प्रकरणे या पुर्वीही घडलेली अाहेत.अाम्ही वारंवार सरकारला नाभिक समाजाला संरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत अाहोत.
अापल्या समाज बांधवाला न्याय मिळाला पाहिजे
म्हणुन  सोमवार दि.२८/०९/२०२० रोजी सकाळी ११:०० वाजता लोकशाही मार्गाने अापल्या कुर्डुवाडी शहरातील प्रांत कार्यालय प्रांत अाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात अाले.
त्या निवेदनामध्ये मृत सुदेश हंसराज थुले यांच्या खर्या हल्लेखोराला अटक झाली पाहिजे व त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या साठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे.
त्यांच्या कुटुबांला सरकारच्या वतीने अार्थीक मदत दिली पाहिजे.कारण नाभिक कुटुबांतील प्रमुख पुरुषाचीच हत्या झालेली अाहे.
नाभिक समाजावर होणारे हल्ले,त्यांच्यावर होणारी टिंगल टवाळी बंद करण्यासाठी नाभिक समाजाला संरक्षण कायद्याखाली कायदा करावा असे निवेदन देण्यात अाले.
या वेळी राष्टीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर,रामभाऊ राऊत,पोपट गाडेकर,संतोष गाडेकर,राजु गोरे,बापु वाघमारे,पांडुरंग राऊत,सुधिर काशिद,अायुष गाडेकर,तेजस गाडेकर,कुमार दळवी अादी नाभिक समाज बांधव ऊपस्थीत होते.

No comments:

Post a Comment