*पत्रकार सुरक्षा समितीच्या राज्य उपाध्यक्ष पदी मल्लिनाथ जळकोटे यांची निवड*
-पत्रकार सुरक्षा समितीची खानापूर ता तुळजापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते या बैठकीत
*पत्रकार संरक्षण कायदा*
*जेष्ठ पत्रकार सामान पेन्शन*
*पत्रकारांसाठी विमा व घरकुल योजना*
*राज्यातील पत्रकारांची नोंदणी*
*राज्यातील युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
*राज्यातील कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबाला तात्काळ पन्नास लाख रुपये मदत करणे बाबत*
यासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयांवर सखोल चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी मल्लिनाथ जळकोटे यांची एकमताने निवड करण्यात आली पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना यांच्याहस्ते राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे यांचा पुष्प गुच्छ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या बैठकीचे सूत्रसंचालन उस्मानाबाद जिल्हा संघटक दिनेश सलगरे यांनी केले, या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे, तुळजापूर तालुका अध्यक्ष आयुब शेख, तालुका उपाध्यक्ष प्रमोद कावरे, सचिव अमीर शेख, तुळजापूर शहर अध्यक्ष सिद्धीक पटेल सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार अक्षय बबलाद सह जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे, उपसरपंच रहीम मुजावर, पोलीस पाटील अमोल पाटील, दिलीप इटकळे, राजकुमार जेऊरे, उमाकांत काशीद,, गणेश भातुसे उमाकांत जेऊरे, सोमनाथ मुंजे गौरीशंकर जेऊ रे, प्रभूलिंग जेऊरे, श्रीशैल जळकोटे, नेमिनाथ जळकोटे, धोंडिबा जोकार, महेश जेऊरे, सुभाष जळकोटे, मनोज जळकोटे, सागर पाटील सह खानापूर मधील ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते समाजभान जपणाऱ्या व समाजकार्याची आवड असलेले सर्वसामान्य माणसाला नेहमीच अडचणीत मदतीला धावून जाणाऱ्या मल्लिनाथ जळकोटे यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने मराठवाडा मधील पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त होत असून पत्रकारांचे युवा नेतृत्व मल्लिनाथ सरांच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न नक्कीच सुटतील अश्या भावना अनेक पत्रकारांनी व्यक्त केल्या असून मल्लिनाथ जळकोटे यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात असून पत्रकारांमध्ये नवंचैतन्य चे वातावरण निर्माण होऊन अनेक पत्रकारांनी मल्लिनाथ जळकोटे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments:
Post a Comment