विशेष प्रतिनिधी/ अजित परबत- अमेरिकेकडून आता भारताला सर्वात मोठी ऑफर,
भारताची काय भूमिका?
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे.रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर निर्बंध लादले.
मात्र भारताला पाश्चात्य देशांनी वारंवार आवाहन करूनही या हल्ल्यात भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे.भारताच्या या भूमिकेमागे महत्वाचे कारण म्हणजे भारत मोठ्या प्रमाणात संरक्षण हत्याराबाबत आजही रशियावर निर्भर आहे.अमेरिकेस भारताशी ही गरज माहीती आहे.
त्यामुळेच आता अमेरिकेकडून भारताला मोठी ऑफर दिली आहे.
अमेरिकेने भारताला संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे म्हंटल आहे.तसेच रशियाच्या शस्त्रास्त्रांवर टीका केली आहे.
रशियाची सुमारे 60% क्षेपणास्त्रे कार्यरत स्थितीत नसल्यामुळे भारताने शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून राहणे योग्य आहे का,याचा विचार करण्याची गरज असल्याचे अमेरिकेने म्हंटले आहे.रशियन शस्त्रे युद्धभूमीवर किती खराब कामगिरी करत आहेत हे पाहण्यास अमेरिकेने भारताला सांगितले आहे.
अमेरिका भारताला शस्त्र पुरवील: राजकीय विषयांवर अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव व्हिक्टोरिया नूलॅड यांनी बुधवारी दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धाबाबत बोलणे झाले आहे.आणी अमेरिका संरक्षण पुरवठ्यासाठी रशियावरील अवलंबित्व संपुष्टात आणण्यास भारताला मदत करण्यास तयार आहे.
रशिया-चीनची जवळीक भारत-अमेरिकेसाठी चांगली नाही:
रशिया-चीन संबंधाचा उल्लेख करताना ते म्हणाले की युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियाने चीनकडे मदत मागितली आहे.तो चीनकडून पैसे आणी शस्त्रास्त्रांच्या मदतीची मागणी करत आहे. यामुळेच रशिया आणी चीनमधील संबंध दृढ होत आहेत. जे आपल्यासाठी योग्य नाही आणी भारतासाठीही.
रासायनिक आणी जैविक शस्त्रांच्या वापराबाबत रशिया बेजबाबदार विधाने करत आहे.ज्यावेळी अतिरेकी शक्ती एकत्र येत आहेत, अशावेळेस भारत आणी अमेरिकासारख्या लोकशाहीने एकत्र उभे राहणे आवश्यक आहे.
रशियन शस्त्रास्त्रांवर प्रश्न उपस्थित केले गेले: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की आम्ही या वस्तुस्थितीबद्दल देखील बोललो की रशिया खरोखरच भारताला विश्वासार्ह संरक्षण पुरवठादार आहे का? अशा देशाकडून संरक्षण शस्त्रे घ्यायची आहेत का? रशियन शस्त्रे युद्धभूमीवर किती खराब कामगिरी करत आहेत ते पहा.
त्यांच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी सुमारे 60% क्षेपणास्त्राची कार्यरत नाहीत.
या संघर्षात रशियाला खूप लवकर शस्त्रास्त्रांचे मोठे नुकसान झाले आहे. ते म्हणाले, ' मग प्रश्न पडतो की, रशियाकडे कोणाला देण्यासाठी शस्त्रे असतील का? जर आपण रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत देऊ शकतो, तर ती भारताला का देऊ शकत नाही. पुतीनसारख्या व्यक्तीवर अवलंबून राहणे योग्य आहे का? अशा परिस्थितीत, आम्ही पर्याय म्हणून तुमचा (भारताचा) जोडीदार बनण्यास उत्सुक आहोत.


No comments:
Post a Comment