माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा तालुका भाजपाच्या वतीने महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा निषेध-
माननीय मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडवणारे पाऊल उचलले आहे मात्र शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारे काँग्रेस आणि विरोधक विनाकारण अपप्रचार करून राजकारण करीत आहेत. मोदी सरकारच्या नवीन कायद्यामुळे शेतकरी बंधमुक्त होऊन तसेच दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, परंतु हे महाविकास आघाडी सरकार यात राजकारण करत असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे.
तसेच माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या मताचा अधिकार कायदा महाविकास आघाडी सरकारने स्थगित केला आहे यासाठी राज्यातील या महा विकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली माढा तहसील येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित योगेश बोबडे अध्यक्ष माढा तालुका भाजपा, योगेश पाटील अध्यक्ष माढा तालुका युवा मोर्चा, गिरीश ताबे युवा मोर्चा अध्यक्ष टेंभुर्णी शहर, मदन मुंगळे सरचिटणीस तालुका भाजपा, सौ. गीताताई देशमुख जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा, गणेश देशमुख तालुकाध्यक्ष विधी सेल भाजप, विवेक कुंभेजकर किसान मोर्चा उपाध्यक्ष, विजय महासागर, संध्याताई कुंभेजकर तालुका अध्यक्ष महिला मोर्चा माढा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment