Breaking

Friday, 28 January 2022

करमाळा तालुका प्रतिनिधी/ संदीप शिंदे - गुरू राजनबाबूंची शाबासकी आणी माझी नवी इनिंग...राजा माने.


*गुरु राजनबाबूंची शाबासकी आणि माझी नवी इनिंग..* 
राजेंद्र दर्डा यांनी केले "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.."ची प्रकाशनपूर्व पहिली प्रत व व्यक्तिचित्रांचे कौतुक !
*नमस्कार,*
*आज माझ्या जीवनातील अत्यंत आनंददायी क्षण मी अनुभवला!१९८५ साली ज्यांनी माझ्या डोक्यावर विश्वास आणि प्रेमाने हात ठेवला.. निटनेटकं राहण्याबरोबरच अगदी फोनवर कसे बोलावे इथपासून करिअर आण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्यांनी मला शिकविला.. ज्यांनी सर्वार्थाने मला जीवनात खंबीरपणे उभे राहायला शिकविले त्या गुरु व माझे आदर्श आदरणीय राजनबाबू तथा राजेंद्र दर्डा यांचा माझ्या ड्रीम प्रोजेक्ट "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." आशीर्वाद मिळाला! त्यांच्या शाबासकीने मी लवकरच सुरु करणार असलेल्या नव्या इनिंगला हत्तीचे बळ मिळाले..त्या नव्या इनिंग बद्दल  आपल्याशी माझा लवकरच संवाद होईलच.. तुर्तास थँक्स आदरणीय राजनबाबू!*
 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सव निमित्ताने  माझ्या"ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." या पुस्तकाची प्रकाशनपूर्व पहिली प्रत आणि ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्राची आकर्षक फ्रेम लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ व माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना आज भेट दिली.औऱंगाबादमध्ये लोकमत भवन येथे पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुंबईत होणाऱ्या नियोजित पुस्तक प्रकाशन व व्यक्तिचित्र प्रदर्शन समारंभाचे संयोजक बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे व सहसचिव मुरलीधर चव्हाण तसेच. प्रिंटवेल इंटरनॅशनलचे संचालक सागर प्रदीप शिंदे यांच्या हस्ते ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या राजेंद्र दर्डा यांच्या व्यक्तिचित्राची आकर्षक फ्रेम दर्डा यांना भेट देवून सत्कार करण्यात आला.मी अंतिम छपाई झालेल्या पुस्तकाची पहिली प्रत त्यांना प्रदान करुन आशीर्वाद घेतले.
*राजेंद्र दर्डा यांनी "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." पुस्तकातील चित्रकार नितीन खिलारे यांच्या व्यक्तिचित्र रेखटनाचे तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छपाई बद्दल प्रिंटवेल इंटरनॅशनलचे संचालक प्रदीप शिंदे, दिलीप शिंदे, श्रीमती सुनिता कुलकर्णी,सागर शिंदे व टीमचे अभिनंदन केले. या उपक्रमाचे कौतुक केले.पुस्तकाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रस्तावना तर पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे मलपृष्ठ मनोगत. लाभले आहे.माझे मित्र प्रगती प्रकाशनचे संचालकद्वय दत्ता थोरे व संतोष पवार हे पुस्तकाचे प्रकाशक आहेत.* आपल्या कर्तृत्वाने आभाळ कवेत घेतलेल्या विविध क्षेत्रातील ७५ व्यक्तिमत्त्वांच्या गुणांवर  प्रकाश टाकण्यात आला आहे.या कार्यक्रमास लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील, चक्रधर दळवी,प्रेमदास राठोड ,खुशालचंद बाहेती उपस्थित होते.लोकमतचे प्रेसिडेंट ओमप्रकाश केला,व्हाईस प्रेसिडेंट बालाजी मुळे, शैलेश चांदीवाल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर योगेश पाटील,सूरज दाहे यांनी माने यांना शुभेच्छा दिल्या.
*-राजा माने*

No comments:

Post a Comment