Breaking

Friday, 28 January 2022

संपादक/ विजयकुमार परबत- महाराष्ट्र होणार मास्कमुक्त?ठाकरे उचलणार मोठे पाऊल.


महाराष्ट्र होणार मास्कमुक्त? ठाकरे उचलणार मोठे पाऊल

मुंबई,  : राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे.
 पण महिन्याअखेरीस कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. 
एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आतापर्यंत मास्क (mask) हे अत्यंत प्रभावी शस्त्र ठरले आहे. 
पण आता कोरोनाची लाट पाहता राज्य मास्कमुक्त करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 
 महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 
या  बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. 
युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपणही भूमिका घेणार का? 
अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. 
राज्यात मास्क वापरणे आता गरजेचे नसणार अशी चर्चा यावेळी झाली. 
 मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. 
टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण होणार आहे.
महाराष्ट्रातील कोविड १९ संसर्गाची परीस्थिती आणि संभाव्य असलेल्या चौथी आणि पाचव्या लाटेची शक्यता आहे. 
या सर्वांचा सखोल अभ्यास करूनच राज्य सरकार निर्णय घेणार आहे.

No comments:

Post a Comment