माढा तालुका लाॅक डाऊनची घोषणा व्यापाऱ्यांच्या मुळावर.,याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याबरोबरच ईतर ४ तालुक्यांमध्ये १३ आॅगस्टपासुन लाॅकडाऊन सुरू होणार आहे.याकडे आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनींधीचे पुर्णपणे दुर्लक्ष असुन माढा तालुक्यातील व्यापारी कर्जाच्या विळख्यात सापडला असताना,परत लाॅकडाऊन झाले तर व्यापारी पुर्ण ऊध्वस्त होणार आहे.टेंभूर्णी,मोडनिंब,कुर्डूवाडी व माढा ही शहरे लोकसंख्येने जास्त असुन या शहरात कोरोना रूग्ण कमी आहेत.ग्रामीणमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.असे असताना संपुर्ण माढा तालुका लाॅकडाऊन करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनींधीशी चर्चा करूनच घेतलेला आहे.माढा तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यात लोकप्रतिनीधी,प्रशासन व आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे.लसीकरणही खुप कमी प्रमाणात होत आहे.याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.संपूर्ण माढा तालुका लाॅकडाऊन करण्याऐवजी जेथे कोरोना रूग्ण आहेत तो भाग किंवा गावे कंटोनमेंट जाहीर करावीत.परंतु तसे न करता संपूर्ण तालुकाच वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. याला रयत क्रांती संघटना विरोध करणार आहे.तालुक्यातील लहान मोठे दुकानदार,मजुर वर्ग,कामगार वर्ग यांचे मोठे नुकसान होणार आहे.गेल्या दिड वर्षाच्या सततच्या लाॅकडाऊनमुळे व्यापारी कर्जाच्या खाईत लोटला आहे.बॅंकांच्या कर्जांचे हप्ते भरणेही व्यापार्याला मुश्कील झाले आहे. जर परत तालुक्यात लाॅकडाऊन झाले तर व्यापारी आत्महत्या केल्याशिवाय रहाणार नाहीत. तरी कोरोनाग्रस्त भागच लाॅकडाऊन करून बाकी ऊर्वरीत भाग लाॅकडाऊनच्या घोषणेतुन वगळण्यात यावेत.यासंबधी आपल्या लोकप्रतिधींनी सरकारबरोबर चर्चा करून व्यापारी वर्गाची सुटका करावी असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा दिशा समीती सदस्स प्रा सुहास पाटील यांनी केले आहे.
Wednesday, 11 August 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुका लाॅकडाऊनची घोषणा व्यापार्यांच्या मुळावर याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष....रयतक्रांती चे प्रा सुहास पाटील.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुका लाॅकडाऊनची घोषणा व्यापार्यांच्या मुळावर याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष....रयतक्रांती चे प्रा सुहास पाटील.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment