Breaking

Wednesday, 11 August 2021

संपादक/ विजयकुमार परबत- धक्कादायक! सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन.


*धक्कादायक! सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन*

*सोलापूर (प्रतिनिधी) :-**सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त   सुहास भोसले यांचे  निधन झाले. 
ते जिम मध्ये व्यायामसाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, 
एक चांगला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनाला धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुहास भोसले हे विभाग १ एक याठिकाणी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते, जेलरोड पोलीस ठाण्याच्या बाजुला हे कार्यालय होते. 
१ एप्रिल २०२१ रोजी ते अमरावती हून सोलापूरात जॉईन झाले होते,
 मृत्यू समयी त्यांचे वय ५६ असून त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. 
त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच  हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment