Breaking

Friday, 27 August 2021

महाराष्ट्र/ ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सर्वांचे एकमत...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.


ओ.बी.सीं.ना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत,
 उद्धव ठाकरे........
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली  सर्व राजकीय पक्षांची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 
ओ.बी.सी. आरक्षणाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
 या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार झाले होते. 
सकाळी ११ वाजता सह्याद्री गेस्ट हाउसवर ही बैठक सुरु झाली होती. 
या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी ओ.बी.सी. आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आलं. 
ओ.बी.सीं.ना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. 
यासंदर्भात  सर्वपक्षीय बैठकीत आलेल्या सूचना, 
विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सांगितले. 
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओ.बी.सीं.ना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वपक्षांचे एकमत आहे. 
राजकीय आरक्षणामध्ये येणा-या अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे,
 असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी विविध राजकीय पक्षांची मते  बैठकीत समजून घेतली. 
ओ.बी.सी. आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचे ते म्हणाले. 
दरम्यान बैठकीत प्राप्त झालेल्या सुचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसात अभ्यास करून येत्या शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 
मुख्यमंत्र्यांनी या महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षीय नेते उपस्थित राहिल्याची बाब स्वागतार्ह असल्याचे म्हणत ओ.बी.सी. आरक्षणासाठीची सर्वपक्षीय एकजुट आणि एकमत असेच टिकवून ठेऊया असेही म्हटले.

No comments:

Post a Comment