‘महाराष्ट्र सदन प्रकरणात घाईत गुन्हा!’
मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना ज्या गुन्ह्य़ामुळे तुरुंगात जावे लागले,
तो गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घाईघाईत दाखल केल्याचे मत मे.सत्र न्यायालयाने नोंदविले आहे.
शासकीय तज्ज्ञाऐवजी खासगी तज्ज्ञाकडून मदत घेतल्याच्या प्रक्रियेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सदन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जून २०१६ मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर सक्तवसुली महासंचालनालयाने भुजबळ यांना अटक केली होती.
ए.सी.बी.ने दाखल केलेल्या फिर्यादीवरच ही अटक झाली होती.
इंडिया बुल या कंपनीला राज्य ग्रंथालयाचा भूखंड प्रकरणातही आणखी एक गुन्हा ए.सी.बी.ने दाखल केला.
महाराष्ट्र सदन प्रकरणात विकासक कृष्णा चमणकर व त्यांच्या कुटुंबातील चौघांना आरोपी करण्यात आले होते.


No comments:
Post a Comment