Breaking

Saturday, 25 December 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - अकलूज येथे मध्यप्रदेशातील ऊसतोड कामगारांची अकलूज पोलिसांनी केली सुटका.


अकलूज येथे मध्यप्रदेश मधील ऊसतोड कामगारांची अकलूज पोलिसांनी केली सुटका- याबाबत वृत्त असे की मध्यप्रदेश बूर्हाणपूर येथील ऊस तोड मजूर व माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील शेतकर्यांमध्ये वाद झाला होता, या वादातून शेतकर्याने मध्यप्रदेशातील ऊसतोड मजूर कामगारांना गावी जाण्यासाठी अडथळा निर्माण केला होता, मध्यप्रदेश मधील प्रशासनाच्या पथकासह अकलूज पोलिसांनी 13 ऊसतोड कामगारांची सुटका केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश मधील बूर्हाणपूर येथील काही ऊसतोड कामगार मजूर हे ऊसतोडणीसाठी माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील शेतकर्यांच्या शेतात आली होती. मात्र त्याच वेळी ऊसतोड कामगारांच्या ठेकेदाराचा व शेतकर्यांमध्ये वाद झाला होता. या वादातून शेतकर्यांनी 13 ऊसतोड कामगारांची मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी मनाई केली होती, त्यानंतर सदर ऊसतोड कामगार मजुरांनी येथील सर्व प्रकार ग्रामस्थांना सांगितला होता.

बूर्हाणपूर येथील ग्रामस्थांनी या प्रकरणात ही माहिती स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला दिली होती. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर मध्यप्रदेश प्रशासनाकडून एक पथक अकलूज येथे पाठवण्यात आले होते. या पथकाने पोलिसांच्या मध्यस्थीने वाफेगाव येथील शेतकर्यांकडे असणार्या 13 ऊसतोड कामगारांची सुटका केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुगावकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment