मोडनिंब सह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या दोन दिवसात करण्यात येतील असे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर साहेब यांनी ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये सांगितले. सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता सोलापूर येथील जिल्हाधिकारी दालनात संपन्न झाली. त्यावेळी समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य हनुमंत कुंभार गुरुजी यांनी लसीकरणा बरोबरच मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नसल्याने रुग्णांचे खूपच हाल होत असल्याचे सांगितले .त्यावेळी जिल्हाधिकाऱी यांनी राज्य शासनाचे आम्हाला आदेश नसल्यामुळे रिक्त जागा भरण्यात अडचणी होत्या राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाले असल्याने दोनच दिवसात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा पूर्वीप्रमाणेच करार पद्धतीने करण्यात येतील असे सांगितले.
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन नाव नोंदणी करणे, लसीकरण केंद्रात जाणे तिथे ओळीत उभा रहाणे यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते .काही गावापासून लसीकरण केंद्र गैरसोयीचे आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणून अशा गैरसोयीच्या ठिकाणी लसीकरण केंद्राची सोय करण्यात यावी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी खास शिबिर घेण्यात यावे अशी मागणी हनुमंत कुंभार गुरुजी आणि केली . त्यावेळी अशा गैरसोयीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास शिबीर घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी दिला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणाची सोय होणार असल्याची माहिती कुंभार गुरुजी यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कैलास आढे, सदस्य महादेव माने ,मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment