Breaking

Friday, 13 August 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - लंडन येथे 1 वर्षाच्या environmental engineering या मास्टर कोर्ससाठी कुर्डूवाडी चे योगेश बडेकर यांना संधी.


London येथे 1 वर्षाच्या Msc environmental engineering  या  मास्टर कोर्ससाठी कुर्डूवाडीचे योगेश बडेकर यांना संधी -योगेश हे लहान  असताना वडीलांचे दु:खद निधन झाले. संसाराचे  सारे  ओझे आई वर पडले मुलांना चांगले शिक्षण द्यावे ही आई-वडील यांची ईच्छा होती. आई ने कष्ट करून मुलांना चांगल्या स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देउन आलेल्या संकटातून मार्ग काढत, योगेशला नूतन विद्यालय कुर्डूवाडी 10 वी मधे 83.40% गुण मिळाले होते.गुणवत्ता नुसार पुढील 3 वर्षाचा डिप्लोमा civil engineering साठी  शासकीय तंत्रनिकेतन अवसरी पुणे येथे प्रवेश मिळाला डिप्लोमा मध्ये 85%गुण प्राप्त केले.   Mit colleg of engineering  स्वयंचलित संस्थे मध्ये प्रवेश घेऊन चांगल्या मार्कानी B tech civil engineering केले. विदेशात शिक्षण घेण्यासाठी संधी भेटली.Imperial college of London येथे 1 वर्षा च्या Msc environmental engineering मास्टर्स कोर्स  साठी संधी मिळाली आहे. राजश्री शाहु महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानव यांच्या विचारानुसार आणी त्यांच्या सामाजिक कार्यास अनुसरून स्वता च्या बुद्धी च्या बळावर आज मी यशस्वी आहे असे योगेश यांनी सांगितले.   योगेश चा  सत्कार महात्मा ज्योतिबा फुले महामंडळाचे अध्यक्ष सौरभ गायकवाड यांनी केला, या प्रसंगी आकाश जगताप, नितीन आखाडे, बापू भालेराव, आकाश ओहोळ, यशवंत जगताप,रोहन, शाहिर जगताप हे सर्व उपस्थित होते.

No comments:

Post a Comment