*कोरोना फक्त सामान्यांच्या मुळावर उठला का*
*गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रात अतिसुरक्षित अन् कार्यकुशल मा.मु.उध्दवजी ठाकरे साहेब यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक वगळून लाॅकडावून लागु केला.... लाॅकडावून लागू करताना मांडलेले मुद्दे* :-
1. *पहिला लाॅकडावून शिथिल केला कि लोकांनी आंदोलने सुरु केली असे आपण म्हणालात* (कारखानदारांनी उसदर-पेमेंट न देणे,वीज कनेक्शन कट करु नये अशा स्वरुपाची)
2. *महापुरुषांच्या जयंती घरामध्ये करण्याचे आवाहन करुन बंधने घातली फक्त तीन लोकांनी साजरे करण्याचे निर्बंध घालण्यात आले... कित्येक ठिकाणी गुन्हेही दाखल केले* (मा.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मात्र मोठ्या थाटात उद्घाटन केले)
3. *अत्यावश्यक सेवा वगळून कडक लाॅकडावून जाहीर केला* (तीन किलो गहू अन् दोन किलो तांदळावर....)ई....
*अशा विविध विषयांवर प्रवचणपर मार्गदर्शन करुन लाॅकडावून केले ....यामध्ये पहिल्या लाॅकडावून शिथिल केल्यावर सगळ्यात जास्त पक्षप्रचार ग्रामपंचायत निवडणुक ते पदवीधर निवडणुकीसाठी मेळावे घेऊन सगळ्या बेजबाबदार मंत्र्यापासुन ते विरोधकापर्यंत सगळ्यानी आघाडी घेतली*....
*आज संबंध महाराष्ट्रात संचारबंदी लागू केलेली असताना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे,मिलींद नार्वेकर व माजी मंत्री,खासदार,आमदार यांनी आजचे कोव्हीड उद्घाटनाचा हजारोंच्या गर्दीचा थाट पाहिला तर ..... कोरोना फक्त शेतकरी-शेतमजुर कामगार यांच्यामुळेच महाराष्ट्रात पसरतो की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे..... जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेले शासकीय आदेश जर राज्याचे मंत्री-खासदार-आमदार पायदळी तुडवत असतील तर...पोटासाठी एखाद्या मध्यमवर्गीयाने नियम मोडले दहा हजार दंड करुन गरिबांच्या चुलीत पाणी ओतायचे पाप का करता* ?
*मा.मु.उध्दवजी ठाकरे साहेबांना विनंती आपण संबंधित कार्यक्रमांच्या आयोजकांवर (खेदजनक बाब ही आहे कि आपण त्या कार्यक्रमाची पोस्ट स्वतःच्या पेज वरुन शेअर केली यापेक्षा दुर्दैव काय ) तत्काळ गुन्हे दाखल करावेत अन् महाविकास आघाडी सरकार खरंच जनसामान्यांबाबत तत्पर आहे व कायदा सर्वांना सारखा हे दाखवून ध्यावे असे मत संभाजी ब्रिगेड चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन बापू जगताप यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment