कोरोना बाधित झाल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबावर शारीरिक नाहीतर मानसिक आणि आर्थिक आघातही होतो. अशांना रुग्णालय, औषधे, इंजेक्शन सोबत गरजेच्य वस्तू पुरवण्यासाठी सध्या सोशल मीडिया वर CMS ग्रुप च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वैद्यकीय मदत सुरू केली आहे.
CMS ग्रुप ऑक्सिजन, मेडिकल हेल्प, प्लाजमा, रक्त, इंजेक्शन आणि जेवणाची व्यवस्था गरजू व्यक्तींना करत आहेत. त्यामुळे कोविड काळात रुग्णांना आणि कुटुंबियांना दिलासा मिळत आहे.
कोरोना काळात रुग्ण कुटुंबीयांची परवड लक्षात घेऊन ऑक्सिजन, वैद्यकीय मदत, प्लाजमा, रक्त, इंजेक्शन आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी CMS व्हाट्सअप ग्रुप आणि CMS फेसबुक ग्रुप सोशल मीडिया च्या माध्यमातून CMS - छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप पुढे आला आहे. गरजू लोकांनी CMS ग्रुप सोबत संपर्क केल्यावर CMS ग्रुप चे ॲडमिन व CMS ग्रुप मेंबर मदत मिळवून देतात.
CMS ग्रुप चे महाराष्ट्र मधील ३०+ जिल्ह्यामध्ये, तसेच गुजरात,गोवा आणि काही बाहेर देशा मध्ये सुद्धा ग्रुप च्या माध्यमातून काम चालू आहे. कोणाला Covid संदर्भात मदत हवी असेल तर या ग्रुपची अथवा त्यां जिल्ह्या च्या ॲडमिन सोबत संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.
CMS ग्रुपचे कैलास बाकले यांनी असे आवाहन केले आहे की जे लोक कोरोणा मधून बरे झाले आहेत, त्यांनी जागरूक होऊन आपल्या जवळ च्या ब्लड बँक मध्ये plasma दान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे.
तसेच CMS ग्रुप च्या माध्यमातून काही जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित केले आहेत. त्या मार्फत गरजू ना मोफत रक्त मिळवून देण्यात येत आहे. आज पर्यंत भरपूर लोकांना ऑक्सिजन बेड, व्हेंटलेटर, plasma, रक्त या ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये होत आहे.
No comments:
Post a Comment