नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,73,69,093 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,11,298 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,847 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,15,235 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. कोरोना वॉरिअर्सचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक पत्रकारांचा देखील मृत्यू झाला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी 5 लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार भारत सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या 67 कुटुंबाना आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे. गुरूवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक परिवारास 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती.झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी देखील अशा कुटुंबासाठी सहायता निधीची मागणी केली आहे. केंद्र सरकारने देखील हा मुद्दा गांभीर्याने घेत गुरूवारी एका बैठकीत आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली. केंद्र सरकार 67 पत्रकारांच्या कुटुंबास 5 लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे. "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो" असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी याबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद असलेल्या 194 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते.
कोरोनाग्रस्तांची संख्या 2,73,69,093 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,11,298 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,847 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,15,235 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. कोरोना वॉरिअर्सचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक पत्रकारांचा देखील मृत्यू झाला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी 5 लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार भारत सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या 67 कुटुंबाना आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे. गुरूवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक परिवारास 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती.झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी देखील अशा कुटुंबासाठी सहायता निधीची मागणी केली आहे. केंद्र सरकारने देखील हा मुद्दा गांभीर्याने घेत गुरूवारी एका बैठकीत आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली. केंद्र सरकार 67 पत्रकारांच्या कुटुंबास 5 लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे. "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो" असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी याबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद असलेल्या 194 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते.

No comments:
Post a Comment