कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - विनाकारण फिराल तर पोलिस ठाण्यात रवानगी- याबाबत वृत्त असे की जिल्हा प्रशासनाने शनिवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या आठ दिवसांच्या खडक लोक डाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणालाही रस्त्यावरती फिरता येणार नाही.
वसे विनाकारण फिरणारे लोक आढळल्यास त्यांना थेट पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर ती गुन्हे नोंदविले जाणार आहेत, दोषारोपपत्रही तयार करून त्याच दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली कुरूना संसर्गाची साखळी
तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे पोलीस आरोग्य यंत्रणा रात्रीचा दिवस करून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे तरीसुद्धा अनेक जण लॉकडाऊन असूनही विनाकारण फिरताहेत
त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्या ऐवजी आणखी वाढत आहे त्यामुळे पोलिस प्रशासनाने जे लोक रस्त्यावरती विनाकारण फिरतील, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात मास्क नसलेल्या व्यक्ती व दुचाकी ताब्यात घेतल्या आता रविवार पासून जे रस्त्यावर विनाकारण फिरतील त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले जाईल त्यानंतर दोषारोपपत्र तयार करून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
कोरोना संसर्गाची महामारी ची जाणीव व्हावी याकरिता यापूर्वी नागरिकांना दंड केला आता त्यांना थेट न्यायालयात हजर केले जाईल ह्या आठ दिवसांच्या काळात आरोग्य यंत्रणा रूग्ण शोधणे, टेहळणी, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर करणार आहे.


No comments:
Post a Comment