कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - कोरोना दक्षता समिती, ग्रामपंचायत कळंबे तर्फ ठाणे यांच्या वतीने जाहीर आवाहन- याबाबत वृत्त असे की कळंबे तर्फ ठाणे ता.करवीर कडील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की
गावामध्ये कोरोना पाॅझीटीह्व रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कळंबे तर्फ ठाणे मार्फत दि.12/5/2021 ते 16/5/2021 पर्यंत पाच दिवस गाव 100% बंद ठेवण्याचे घोषित करण्यात आले आहे, या बंद मधून दवाखने,
मेडिकल, दूध, यांना वगळण्यात आले आहे. तसेच करवीर पोलिस स्टेशनच्या सूचनेनुसार या कालावधीत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे, या चित्रीकरणात कोणताही नागरिक विना मास्क व मुक्त संचार करीत
असल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन कोरोना दक्षता समिती, कळंबे तर्फ ठाणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment