मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक - मोडनिंब येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी ऋतुजा सुर्वे यांचे राजेशजी टोपे यांना निवेदन- याबाबत वृत्त असे की मोडनिंब येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्राचा मोडणीम व आसपासच्या वीस ते पंचवीस गावांना उपचारासाठी उपयोग होतो तसेच मोडनिंब हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापूर पुणे हायवेवरती येत असून या रस्त्यावरून सतत अपघात होत असतात काही रुग्ण हे जखमी अवस्थेत असतात तर काही रुग्ण हे मयत झालेले असतात त्यामुळे येथील रुग्णांची हेळसांड होते व त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही मोडनिंब ची लोकसंख्या अंदाजे वीस ते पंचवीस हजाराच्या आसपास असून मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या कमी असल्याने रूग्णांवर वेळीच उपचार होत नाहीत सध्या मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना ऍडमिट करण्याची सुविधा नाही.
तसेच कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक नाही म्हणून मोडनिंबला ट्रामा केअर सेंटर मंजूर केल्यास रुग्णांची हेळसांड होणार नाही अशा आशयाचे निवेदन मोडनिंब राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा ऋतुजा अरुण सुर्वे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे
No comments:
Post a Comment