Breaking

Thursday, 6 May 2021

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी/ सागर लोखंडे - कोविड सेंटर मध्ये रूग्णांच्या होणार्या हाल अपेष्टांबाबत सिद्धार्थ भाऊ गायकवाड यांचे आयुक्तांना निवेदन.


पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी/ सागर लोखंडे - कोविड सेंटरमध्ये रूग्णांच्या होणार्या हाल अपेष्टांबाबत सिद्धार्थ भाऊ गायकवाड यांचे आयुक्तांना निवेदन- याबाबत वृत्त असे की जम्बो कोविड सेंटर मेड ब्रोज हेल्थ केअर मार्फत चालविले 






जात असून त्यांच्याकडे कोविड सेंटर चालविण्यासाठी पुरेसे संख्या बळ नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत व रूग्णांचा मृत्यू दर पाहता आपण कोविड सेंटर मध्ये रूग्णांना जिवंत मारण्यासाठी तर कोविड सेंटर चालवत नाही ना अशी शंका येते असे गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे, 








        जर मेड ब्रोज कंपनीला पुरेसे मनुष्यबळ भेटत नसेल तर आणी त्यामुळे मृत्यू संख्येत वाढ होत असेल तर आमच्या संघटनेच्या निवेदनाच्या माध्यमातून मेड ब्रोज हेल्थ केअरच्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्यांची चौकशी 








करावी अन्यथा आपल्या विरोधात पुढील 2-3 दिवसात टायगर ग्रुप च्या वतीने तीव्र जन आंदोलन केले जाईल असा इशारा सिद्धार्थ भाऊ गायकवाड यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment