नमस्कार,
मन हेलावून टाकणारे दृश्य,नियतीचा क्रूर खेळ,पतोंडा ता, चाळीसगाव येथील,गोकुळ प्रभात भिल,आई कदमबाई भिल ,यांची तीन ही मुलं अपंग आहेत,हात मजुरी करून हे दांपत्य या मुलांचे संगोपन करत होते काही सनवेदशील व्यक्ती थोडी फार मदत करत होते पण या दीड वर्षपासून या कुटुंबाचे
खूप हाल होत आहेत,तीन मुलांपैकी एक मुलगी मोनाली वय 24 पण तिची वाढ सात आठ वर्ष एवढीच सगळं शरीर लुळ पडले फक्त बोलणे खूप चांगले आहे,दुसरा मुलगा विरु वय 17 व तिसरा मुलगा 11 वर्ष त्यांचीही तीच अवस्था वाढ अगदी तीन चार वर्ष एवढीच आई त्यांचे सगळे आवरते वडील मोलमजुरी करून मुलांचे संगोपन करत होते पण आत्ताची परिस्थिती बघता मुलांचा दवाखाना आणि रोजचा उदरनिर्वाह
शक्य होत नाही,काल मला त्यांच्या गावातील व्यक्तीने फोन केला,आणि त्याच फोन वरून या मुलांची आई बोलली ताई माझ्या मुलांसाठी आम्हाला काही मदत करा,तीन दिवसांपासून उपाशी आहोत मुलांना काही भीक मागून थोडं फार खाऊ घालते,त्यांना दवाखाना लागतो,आणि रडायला लागली ताई या जीवन जीवाला मारू पण नाही शकत काहीतरी मदत करा,
लगेच जाऊन वस्तुस्थिती पाहीली, खूप मन हेलवन,इतकी भयानक परिस्थिती छोटी घर वजा पडकी झोपडी आत्ता पाऊस आला तर वाहून जाईल, पोरांच्या अंगावर कपडे नाही,पोरीला कस तरी झाकलेली,घरात बसायला जागा
नाही,मन व्याकुळ झालं,पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे ते हसू बघून डोळ्यातले पाणी बाहेर आल्याशिवाय राहिले नाही,
एकीकडे कपाटात कपडे ठेवायला जागा नाही म्हणून फेकले जातात,ताटातले अर्घे जेवण फेकले जाते आणि दुसरी कडे ही अवस्था,
माझी समाजाला विन्नती आहे आपल्यातील शक्य होईल तेवढी मदत या कुटुंबाला करूया,
🙏🏻🙏🏻
मीनाक्षी निकम
No comments:
Post a Comment