Breaking

Thursday, 1 April 2021

भोसरे शहर प्रतिनिधी/ अमोल हावळे- रामानंद सरस्वती महाराज चिंकहिल येथील आर.पी.एफ.ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची मागणी.


भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे- रामानंद सरस्वती महाराज चिंकहिल येथील आर.पी.एफ. ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची मागणी- याबाबत वृत्त असे की श्री. रामानंद सरस्वती महाराज महादेव टेकडी मंदिर चिंकहिल येथील आर पी एफ ट्रेनिंग सेंटर नाशिकहून परत चिंकहिल ला शिफ्ट करण्याविषयी चे निवेदन मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री श्री पियुष गेयल यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे. निवेदनामध्ये सरस्वती महाराज यांनी रेल्वे मिनिस्ट्री व  रेल्वे borda  नवी दिल्ली यांनी वर्कस मशिनरी आणि rolling स्टाफ program . विषय उल्लेख केलेला आहे .program आयटम नं 583 नुसार चिंकहिल येथील training सेंटर चा विकास करण्यासाठी रूपये 2.91 कोटी मंजुर केले होते त्याप्रमाणे त्या program मधे training centre नाशिक ला हलविण्यासाठी item570 नुसार रूपये 4.92 कोटी मंजूर करण्यात आले व 2016 मध्ये training centre नाशिक ला हलविण्यात आले. हा एकप्रकारे  सोलापूर डिव्हिजनवर अन्याय झाला आहे.  चिंकहिल येथील training centre ला  विकासासाठी मंजूर केला आसताना नाशिक ला हलवण्याची गरज नव्हती. कारण chinkhill येथील  training centre अद्यावत करण्यासाठी आवश्यक असणारी इतर सामग्री येथे उपलब्ध आहे. फायरिंग रेंजसाठी मुबलक प्रमाणात रेल्वे ची जागा उपलब्ध आहे. तसेच training साठी बरॅक व अधिकाऱ्यां  साठी बंगले बांधण्यासाठी भरपूर प्रमाणात जागा आहे. म्हणून श्री रामानंद सरस्वती महाराज यांनी मा पंतप्रधान व रेल्वे मंत्री यांना विनंती केली आहे की नाशिक ला हलवलेले training centre परत  चिंकहिल ला शिफ्ट करावे. व नाशिक साठी मंजूर केलेला निधी 4.92 कोटी चिंकहिल सेंटर च्या विकासासाठी व अधिक चा पाच कोटी निधी ची तरतुद करून चिंकहिल येथील सेंटर पुन्हा कार्यान्वित करावे..चिंकहिल येथील आर पी एफ ट्रेनिंग सेंटर 1930 साला पासून  Barshi  लाईट रेल्वे (gpi) पासून अगदी व्यवस्थित चालू होते ते पुढे चालू राहवे.  खासदार आणि आता चे सामाजिक न्याय मंत्रि रामदास आठवले साहेब यांनी सुध्दा चिंकहिल training साठी 2016 पासून पत्रव्यवहार केले आहे .सध्याच जे .electric power project चिंकहिल येथे प्रस्तावित केलेल आहे तो Barshi    येथील जुने रेल्वे station येथे सुरू करण्यात यावा. कारण त्या ठिकाणी 32 एकर रेल्वे ची जागा उपलब्ध आहे ही मागणी श्री रामानंद सरस्वती महाराज यांनी आपल्या निवेदनात नमूद केलेली आहे.

No comments:

Post a Comment