विधानभवन पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आढावा बैठक संपन्न झाली. यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील चांडोली व शिरोली कोविड आरोग्य केंद्रांना तातडीने कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. त्याचबरोबर हडपसर व म्हाळुंगे (ता. खेड) येथे जंबो कोविड केअर सुरु करता येईल का याची चाचपणी करावी, अशी मागणी या आढावा खा.अमोल कोल्हे यांनी बैठकीत केली.
चांडोली कोविड सेंटरमध्ये ३ व्हेंटिलेटर चालविण्यासाठी तसेच शिरोलीच्या कोविड केअर सेंटरसाठी १ फिजिशियन, १ एक्स रे, १ ईसीजी मशिन, २ टेक्निशियन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मनुष्यबळ मिळाले तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सेंटर तत्काळ सुरू करता येईल,असे मत खा.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
सध्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पेशंटला दाखल होण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टची अट बंधनकारक केली आहे. ती रद्द करून त्याऐवजी रॅट पॉझिटीव्ह रिपोर्ट पाहावा. जेणेकरून पेशंटला आरटीपीसीआर टेस्टसाठीची धावपळ थांबेल. तसेच लवकर प्रवेश मिळाल्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकतील.
तसेच कोरोना उपचारासाठी महापालिका किंवा जिल्हा परिषदेकडे नोंदणी न केलेल्या हॉस्पिटल्सने देखील पेशंट दाखल करून घेत आहेत. परंतु रेमडिसीवीर इंजेक्शनसाठी नातेवाईकांची धावपळ होत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या इंजेक्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी खा.कोल्हे यांनी केली.
रेमडिसिवीर पेक्षा ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करावे. काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने प्लाझ्मा थेरेपीची ट्रायल बंद केली आहे. तरीही डॉक्टरांकडून मागणी केली जात असल्यामुळे प्लाझ्मासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. कोविड टास्क फोर्सने सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करावे असे दादांनी सुचविले.
केंद्र सरकारकडून नेमके किती व्हेटिंलेटर आले त्यापैकी किती कार्यान्वित आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पुणे जिल्ह्याला आणखी व्हेटिंलेटर मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुराव्यासाठी काही मदत लागल्यास आम्ही खासदार सदैव तयार आहोत, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.


No comments:
Post a Comment