Breaking

Saturday, 17 April 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार- पुणे महानगरपालिकेच्या कोविड-19 गृह विलगीकरण अॅप्लिकेशन होम आयसोलेशन अॅपचे उद्घाटन.


पुण्यातील विधानभवनाच्या सभागृहात आज करण्यात आले. गृह विलगिकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या वापरासाठी व त्यांच्या आरोग्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीनं हे ॲप विकसित करण्यात आलं आहे. या ॲपचा निश्चित चांगला उपयोग होईल, यात शंका नाही. ताप, पल्स, ऑक्सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचं मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः ॲपद्वारे साध्या क्लिकवर करू शकतो. रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो; जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचेल. रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल. या ॲपच्या प्रभागनिहाय डॅशबोर्डवर तसंच मुख्यालयातील वॉररूममध्ये एकत्रित डॅशबोर्डवर ऑक्सिजन, ताप इत्यादी सारख्या रुग्णांच्या लक्षणांवर व आरोग्याच्या स्थितीवर निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या रुग्णांकडे स्मार्टफोन नाही त्यांचे आप्तजन आरोग्यविषयक माहिती पाठवू शकतात.

No comments:

Post a Comment