बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे-पुरुषोत्तमपुरीत एक जेसीबी, तीन हायवा पकडले - या बाबत सविस्तर वृत्त असे की अवैध वाळू उपशाविरूद्ध पोलिस अधीक्षकांच्या विशेष पत्त्याची मोहीम सुरू असून मंगळवार दिनांक 23 रोजी पहाटे दीड वाजता पुरुषोत्तम पुरी तालुका माजलगाव येथे छापा टाकून पथकाने एक जेसीबी व तीन हायवा पकडले सुमारे 1 कोटी 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चारी वाहनांच्या चालकांना पकडले असून मालकंसह एकूण आठ जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पुरुषोत्तम पुरी तालुका माजलगाव येथे गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती त्यावरून त्यांनी
सहकार्यांसोबत सोमवारी मध्यरात्री पुरुषोत्तम पुरी येथील नदीपात्रात सापळा रचून मध्यरात्री दीड वाजता एक जेसीबी व तीन हायवा अवैध वाळू उपसा करताना व वाहतूक करताना पकडले, चारही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे, एक कोटी 35 लाखांच्या मुद्देमालासह चारही आरोपींना ग्रामीण ठाण्यातील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार बापू राऊत यांच्या फिर्यादीवरून जेसीबी चालक श्रवण गायकवाड रा.माजलगाव, टिप्परचालक शेख रसीद, शेख चांद रा.शिंपीटाकळी, ता.माजलगाव, शेख अज्जू, शेख सलीम रा.पात्रूड ता.माजलगाव, यांच्या सह चार वाहनांचे मालक अशा एकूण आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


No comments:
Post a Comment