Breaking

Sunday, 18 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- सोलापूर जिल्ह्यासाठी रेमडेसिविर, आॅक्सीजन,व औषधांचा पुरवठा तात्काळ होण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन.


सोलापूर जिल्हयात कोरोना महामारीचा वाढता प्रभाव पाहता, मा.मुख्यमंत्री महोदय, मा. आरोग्य मंत्री महोदय व मा.जिल्हाधिकारी महोदय यांना रेमडीसीव्हर इंजेक्शन, ऑक्सीजन व औषधांचा पुरवठा तात्काळ होणेबाबत निवेदन सादर करण्यात आलेले आहे.
कोरोना महामारीचा जिल्हयातील वाढत्या प्रभावामुळे मृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. राजकारण करायच्यावेळी राजकारण करु.  परंतू आज माणसंच जगली नाहीत तर राजकारण करुन काय उपयोग.  त्यामुळे मी जनतेस अवाहन करतो की, जनतेने घरात राहून माझे कुटूंब माझी जबाबदारी घेऊन प्रशासनाने दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन करुन सोलापूर जिल्हयातील कोरोनाचा प्रादूर्भाव हद्दपार व संपुष्टात आणणेसाठी प्रशासनास सहकार्य करावे.
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे जिल्हयातील हॉस्पीटल्स अपूरी पडत आहेत. या पार्श्वभुमीमुळे माझ्या व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतीगृह येथे ग्रामीण भागातून प्राधिकृत करण्यात आलेल्या रुग्णांच्या कोरोना उपचारासाठी जेवढे शक्य होईल तितक्या पूर्ण क्षमतेने आयसीयु बेड, जनरल बेड व उपचारासाठी दाख्ल नातेवाईकांना निवासाची व्यवस्था करण्याची कार्यवाही तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.  यामध्ये जनतेच्या अनमोल सहकार्याची भावना व्यक्त करतो. अशी माहिती VBP NEWS सोबत बोलताना 
श्री. अनिरुध्द विठ्ठल कांबळे,
अध्यक्ष,जिल्हा परिषद, सोलापूर. यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment